कोपरगाव, प्रतिनिधी
सूर्यतेज संस्था कोपरगांव आयोजित कोपरगांव फेस्टिव्हल अंतर्गत दीपावली-पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्यात नावजलेल्या या स्पर्धेचा उपक्रम १२ वर्षापासून सुरु आहे. कृष्णाई बँक्वेट हाॅल येथे सन २०२४ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आत्मा मालिक ध्यानपिठाचे संत परमानंद महाराज, संत साधनानंद महाराज, संत प्रेमानंद महाराज,अग्रवाल चहा कंपनीचे संचालक नारायण अग्रवाल, धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्मच्या संचालिका आयुर्वेदाचार्य डॉ. रिध्दी आव्हाड, सुमंगल प्लायवुडचे संचालक सचिन भडकवाडे, कृष्णाईचे संचालक शेखर देशमुख, सूर्यतेज सल्लागार समितीच्या सौ. लताताई भामरे, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके ,पुष्पांजली शाॅपी संचालिका पुनम अमृतकर, विश्व विख्यात रांगोळीकार मसुदा दारूवाला उपस्थित होते.
या प्रसंगी संत परमानंद महाराज पुढे म्हणाले, परंपरा आणि पारंपरिक वेशभूषा अंगिकारणे महत्त्वाचे आहे.गोदातटावरील कोपरगांव हे साधू-संतांना माहेरी आल्याची अनुभुती देतात. संतांच्या सानिध्यात यावे. हीच ती वेळ आहे. सुख तुमच्या आत दडलयं त्याचा शोध घ्या. माणूस म्हणून जगत रहा. जीवन मांगल्य आहे. असे सांगत सूर्यतेजच्या माध्यमातून समुहाने एकत्र येऊन २४ वर्षातील दोन तपांच्या कार्याचा गौरव केला.
या स्पर्धेला विसपुते सराफ, राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ. रामदास आव्हाड, एच. एम. राजपाल, सुमंगल प्लायवुड, अग्रवाल चहा कंपनी, पुष्पांजली शाॅपी, कापसे पैठणी, सुशांत आर्ट्स अॅण्ड पब्लिसिटी, पांडे स्विटस् यांचे विशेष सहकार्य लाभले.
पारंपरिक ,निसर्ग चित्र, व्यक्ती चित्र, सामाजिक , व्यंग चित्र, भौमितिक आकार, पुष्प सजावट या विषयी कलाप्रकारात आयोजन केलेल्या स्पर्धेत सुमारे ३०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यातील प्रथम क्रमांकास कापसे पैठणी, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र तर गुणवत्ता रांगोळीस पुष्पांजली भेटवस्तू, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. या प्रसंगी गुरु कोचिंग क्लासेस आणि हाॅबी क्लबच्या विविध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचा शुभारंभ भारतमाता प्रतिमा पूजन, दीप-प्रज्वलन आणि सामुदायिक राष्ट्रगीतने करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सूर्यतेजचे उपाध्यक्ष मंगेश भिडे, मतीन दारूवाला, डॉ. निलीमा आव्हाड, भाग्यश्री जोशी, प्रा. माया रक्ताटे, वर्षा जाधव, अनंत गोडसे, गणेश मोराणकर महेश थोरात, प्रा.
वासंती गोंजारे, वर्षा जाधव,श्रृती जाधव, श्रध्दा देवरे, प्रियंका साटोटे यांचेसह सर्व सूर्यतेज संस्थेचे सदस्य आणि दीपावली-पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धा आयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले.
उपस्थितांचे स्वागत सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके, प्रास्ताविक प्रा. लताताई भामरे यांनी तर संस्थेच्या कामकाज माहिती वर्षा जाधव यांनी दिली. सुत्रसंचालन निलम मगर, तृप्ती कुलथे यांनी तर आभार मंगेश भिडे यांनी मानले. सामुदायिक वंदेमातरम् ने समारोप करण्यात आला.सूर्यतेजच्या आयोजनाचे उपस्थितांनी कौतुक केले.