श्रीगोंदा:- राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच वातावरण चांगलच तापलंय. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका अखेर जाहीर करण्यात आल्या आहे. त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. याच अनुषंगाने श्रीगोंद परिषदेचे सध्याचे गणित, राजकीय परिस्थिती, तापलेल वातावरण जाणून घेणारे आहोत. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीत महायुतीच लढत पाहायला मिळणार आहे. सद्या श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू असून नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी सर्वच पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या पाहिला मिळते, विशेष म्हणजे श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीत महायुतीतच लढत होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे.
श्रीगोंदा नगरपरिषदेची मागील निवडणूक 2019 च्या जानेवारी महिन्यात पार पडली होती. 2023 ला त्याची मुदत संपली. त्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून श्रीगोंदा नगरपरिषदेत प्रशासक आहे. श्रीगोंदा नगरपरिषदेत मागील निवडणुकीत नगराध्यक्षपदी शुभांगी पोटे या निवडून आल्या होत्या तर सर्वाधिक नगरसेवक भाजप म्हणजेच पाचपुते यांचे आले होते. गेल्यावेळी 19 पैकी 11 नगरसेवक भाजप तर 8 नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले होते. म्हणजेच गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती भाजपची झाली होती. त्यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी अशी थेट लढत झाली होती
गेल्या निवडणुकीतील आकडेवारी
श्रीगोंदा नगरपरिषद 19 जागा 1 नगराध्यक्ष
भाजप- 11
राष्ट्रवादी- 8
नगराध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे
यावेळी नगरसेवकांची संख्या वाढली असून 22 नगरसेवक निवडून द्यायचे आहे आणि 1 नगराध्यक्ष
यावेळी इच्छुक नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी सर्वच पक्षांकडे अनेक इच्छुक आहे. त्यामुळे सर्वच पक्ष वेगवेगळे लढण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे महायुतीतील पक्षांमध्येच आमने-सामने लढाई होणार आहे. भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी देखील तसे संकेत दिले आहे. त्यामुळे पाचपुते विरुद्ध इतर असे चित्र श्रीगोंद्यात निर्माण झाल आहे. श्रीगोंदा शहरात महाविकास आघाडीची ताकद कमी असून महायुतीतील पक्ष एकमेकांच्या आमनेसामने लढतांना दिसतील. भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याच विक्रम पाचपुते यांनी सांगितला आहे. त्याचबरोबर इतर पक्षातील देखील उमेदवार इच्छुक असून अनेक राजकीय धक्के देत लवकरच प्रवेश केले जातील अस विक्रम पाचपुते यांनी म्हटलं आहे. तर श्रीगोंदा नगरपरिषदेत भाजपचीच सत्ता येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील पक्ष फुटी नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पहिल्यांदाच होत आहे. मात्र श्रीगोंद्यात महायुतीतील पक्षातच आमने सामने लढत पाहिला मिळणार आहे. भाजप म्हणजेच पाचपुते यांना दूर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित लढण्याच्या तयारीत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरला नसला तरी शिंदेंच्या शिवसेनेकडून उपजिल्हाप्रमुख मनोहर पोटे आणि त्यांच्या पत्नी शुभांगी पोटे यांचे नाव चर्चेत आहे. तशी तयारी देखील त्यांनी सुरू केली आहे. अजित पवारांचे राष्ट्रवादीसोबत जर युती झाली तर नगराध्यक्षांसह सर्वाधिक नगरसेवक आमचे निवडून येतील असा विश्वास मनोहर पोटे यांनी व्यक्त केला आहे. मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी लढल्यास शिंदे सेनेचा देखील स्वतंत्र पॅनल उभा करणार असल्याचे त्यांनी सांगितला आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे देखील जोरदार तयारी असल्याचं दिसतंय. जिल्हा परिषद अध्यक्ष ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी नगराध्यक्ष पदासाठी आघाडी घेतली आहे. भोस हे त्यांची सून गौरी भोस यांच्यासाठी आग्रही आहे. महाविकास आघाडीने सर्वच पॅनल लढण्याची तयारी सुरू केली असून महाविकास आघाडीच विजय होईल असा विश्वास बाबासाहेब भोस यांनी व्यक्त केला आहे
एकंदरीतच नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलीये. श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुक तिरंगी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळणार आहे. आता कोणाला तिकीट मिळतं आणि कोणाचा पत्ता कट होतो हे येणाऱ्या काळात कळेलच.. मात्र नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्षाने कंबर कसल्याच दिसून येतय. त्यामुळे श्रीगोंदा नगरपरिषदेत कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


