Home जिल्हा बातमी डॉ सागर वाघ यांची अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर सदस्य...

डॉ सागर वाघ यांची अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर सदस्य म्हणून निवड

0
7

 

अहिल्यानगर:- शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ सागर रामनाथजी वाघ यांची अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. दिनांक २२ ते २९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान पार पडलेल्या ई -वोटिंग कार्य प्रणालीत महाराष्ट्रातून एकूण ज्या सहा सदस्यांची निवड झाली आहे. त्यात डॉ सागर वाघ दुसऱ्या क्रमांकावर तीन हजार पेक्षा जास्त मताने निवडून आले आहे. डॉ सागर वाघ हे बालरोगतज्ञ यांबरोबरच लहान मुलांचे अॅलर्जीस्ट व इम्युनोथेरपीस्ट असून ग्रामीण ते शहरी अशा दोन्ही स्तरांवर बाल आरोग्य सुधारण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय राहीले याहे. राष्ट्रीय व्यासपीठातून ते -क्लिनीकल प्रॅक्टिसमध्ये गुणवता वाढ, अपडेटेड उपचार पद्धतींचा प्रसार या दिशेने कार्य करण्याचे स्पष्ट व्हिजन मांडत आहेत. याअगोदर अहिल्यानगरचे डॉ सूचित तांबोळी यांनी हे पद भूषविलेले आहे. या निवडीसाठी अहमदनगर मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ सुनील म्हस्के, महाराष्ट्र आय एम चे डॉ निसार शेख, बालरोगतज्ञ डॉ अनिल कुर्हाडे, डॉ सुभाष फिरोदिया, डॉ सूचित तांबोळी, डॉ नानासाहेब अकोलकर, डॉ विवेक देशपांडे, डॉ शाम तारडे. डॉ. पारगावकर मॅडम, महाराष्ट्र बालरोगतज्ज्ञ संघटनेचे डॉ सचिन वहाडणे, नगर बालरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ जयदीप देशमुख, सेक्रेटरी डॉ उज्ज्वला शिरसाठ, खजिनदार डॉ संदीप गायकवाड, डॉ प्रताप पटारे, डॉ दीपक करपे, डॉ रामदास बांगर, डॉ पियुष खंडेलवाल, डॉ दीपक अग्रवाल, डॉ गणेश माने, डॉ हेमंत नाईक, डॉ रवि वने, डॉ विजय फलके, डॉ मंगेश कुलकर्णी, डॉ भूषण देव, डॉ अमित काकड , डॉ विक्रम पानसंबळ, डॉ सोनाली निकम, डॉ मेविश शेख तसेच अहिल्यानगर येथील प्रथितयश बालरोगतज्ज्ञांचे व आयएमचे सर्व डॉक्टर्सचे सहकार्य लाभले. नुकताच त्यांचा अहमदनगर बालरोगतज्ज्ञांतर्फे सत्कार करण्यात आला त्यावेळी हे सर्व बालरोगतज्ज्ञ हजर होते.डॉक्टर सागर वाघ हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कै.रामनाथजी वाघ यांचे चिरंजीव व जयंत वाघ व डॉक्टर धनंजय वाघ यांचे धाकटे बंधू आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here