मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना…
मुंबईला रवाना होण्यापूर्वी जरांगेंनी अंतरवाली सराटीत केली गणरायाची पूजा आणि आरती…
महिलांनी औक्षण करून जरांगेंना उपोषण आंदोलनासाठी दिल्या शुभेच्छा…
जरांगे यांच्यासोबत मराठा समाज देखील मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना…
jalna
maratha andolak manoj jarange patil मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना झालेत. मुंबईला रवाना होण्यापूर्वी जरांगेंनी अंतरवाली सराटीत गणरायाची पूजा करत आरती केलीय. यावेळी गावातील महिलांनी औक्षण करून जरांगेंना त्यांच्या उपोषण आंदोलनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आक्रमक झाले असून सातव्यांदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यासाठी जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर आपल्या उपोषणासाठी रवाना झाले आहेत. यावेळी जरांगे यांच्यासोबत मराठा समाज देखील मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाला असून सोबत गणपती घेऊन मराठे आता मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.